spot_img
अहमदनगरओंकार ग्रुप तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी; उद्योगपती बोत्रे पाटील यांनी...

ओंकार ग्रुप तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी; उद्योगपती बोत्रे पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री 
साखर उद्योगात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपती बाबुराव बोत्रे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा सिध्द केला आहे. ओंकार ग्रुपतर्फे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त केली.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार संभाजीराव निलंगेकर आणि यामिनी पाटील यांचाही प्रमुख सहभाग होता. याप्रसंगी बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने मदतीचा हात पुढे केला असून या उपक्रमात ओंकार ग्रुपचा सहभाग राहावा ही आमची भावना आहे.

पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा प्रगतीचा दीपोत्सव उजळावा, या उद्देशाने आम्ही कर्तव्य पार पाडले. ओंकार ग्रुपने शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत दिलेली ही मदत ओंकार ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...