spot_img
अहमदनगरनगर शहर हादरले! मुकुंदनगरमध्ये युवकाचा खून

नगर शहर हादरले! मुकुंदनगरमध्ये युवकाचा खून

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी सायंकारी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. युवकावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. दरम्यान जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यू झाला. जिशान खान (वय 18) असे युवकाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस निरीक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरु असतांनाचा त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गद केली होती.सदर हल्ल्‌‍याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...