spot_img
ब्रेकिंगशहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; 'तो' नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी 'असा'...

शहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; ‘तो’ नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी ‘असा’ केला एन्काऊंटर

spot_img

Crime News: उत्तर प्रदेशच बदायू शहर एका भयंकर कर्त्याने हादरलं आहे. दोन सख्ख्या भावांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. साजिदने घरात घुसून कुऱ्हाडीचे घाव घालून दोन लहान मुलांना संपवलं. अन्य एका मुलावरही त्याने हल्ला केला. हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिद घरातून पळाला. तो नाक्यावर पोहोचला होता, तिथेच पोलिसांनी त्याच एन्काऊंटर केला.

वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, सिविल लाइन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये साजिद नावाचा एक युवक सलून शॉप चालवायचा. कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता. तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता.

आरोपीने घरात वाद झालेल्या इसमाच्या घरात घुसून मुलांवर हल्ला केला. आरोपीने आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. तसेच त्यांच्याबरोबर खेळ असलेला आणखी मुलगा पियूषवरही (७) त्याने हल्ला केला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला. दोन भावाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते.

कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोकांनी सर्वप्रथम साजिदच सूलनच दुकान पेटवून दिलं. तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पोहोचत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यात आरोपीचा एन्काऊंटर झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...