नगर सह्याद्री / मुंबई
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा मोठा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. शिवसेनेची 1999 सालची घटना वैध असून 2018 साली ठाकरेंनी केलेली घटनादुरूस्ती मान्य नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने खूप मोठा निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा झटका बसला आहे.
1999 सालची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावर असलेली एकमेव घटना असल्याचं ते म्हणाले. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल असं सांगत 2018 सालची शिवसेनेची घटना स्वीकारता करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील लागला आहे. शिंदे गटाचे १६ ही आमदार नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहेत.