नवी दिल्ली / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत विविध घडामोडी सुरु आहेत.आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत आहे.
दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी आली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती व आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून 24 जानेवारी रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणातील एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.