spot_img
देशमोठी बातमी ! रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'हे'...

मोठी बातमी ! रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, ‘हे’ आहे कारण

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई :
रोहित शर्मा याला Mumbai Indians ने कॅप्टन पदावरून कमी केलं होत. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याला ही संधी मिळाली होती. परंतु आता पुन्हा एकदा Mumbai Indians चे कॅप्टनपद रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता आहे.

वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला साऊथ अफ्रिका आणि त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेला मुकावं लागलं. आता हार्दिक पांड्या अफगाण मालिका तसेच आयपीएल देखील खेळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाबरोबर करारबद्ध केलं. एवढंच नाही तर संघात येताच त्याचं प्रमोशन देखील झालं होतं. हार्दिकला थेट मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं होतं. मात्र, आता जशी चर्चा होती तशी तसंच होताना दिसत आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याची शक्यता असल्याने आता मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी पुन्हा रोहित शर्माकडे येण्य़ाची शक्यता असेल.

हार्दिकच्या फिटनेसवर अद्याप कोणतीही अपडेट नाही आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. दुखापतग्रस्त पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्या बरा होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे.

मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...