spot_img
महाराष्ट्रमहाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात? राज ठाकरे दिल्लीत.. मोदी, शहांसोबत बैठक?

महाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात? राज ठाकरे दिल्लीत.. मोदी, शहांसोबत बैठक?

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. त्यामुळे विविध पक्षांना सोबत घेण्याची रणनीती भाजप सध्या आखत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीसोबत भाजपमध्ये जाऊ शकतात अशी माहिती सध्या समोर येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीत असून त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता राज्यातील महायुतीचा भाग होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. यासंदर्भात आता, “मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे. राज साहेब मास लिडर आहेत. म्हणून याचा महायुतीला फायदाच होईल,” असे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते तथा आमदार संयज शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीमध्ये सहभागी होतात का हे पाहणे गरजेचे आहे.

शिरसाट म्हणाले, “आजच्या राजकारणात एकटा लढू शकत नाही, असी परिस्थिती आहे. यामुळे तुम्ही पाहिलं तर कुठलाही पक्ष असेल, तो इतरांना बरोबर घेऊन आपली लढाई लढण्याच्या मनःस्थितीत आहे. यामुळे राज ठाकरेही गेल्या अनेक वर्षांपासून एकटे लढत आहेत. मात्र आऊटपूट मिळत नाही. जर इतरांबरोबर गेले तर आऊटपूट मिळेल हे निश्चित आहे. यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...