spot_img
महाराष्ट्रवातावरण तापलं ! अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव, पहा...

वातावरण तापलं ! अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवार यांना घेराव, पहा नेमका काय घडला प्रकार

spot_img

बारामती / नगर सहयाद्री : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाली आहे. त्यात आता महाराष्ट्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. येथे पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार आहे. त्यात अजित पवारांविरोधात त्यांच्या घरातील सख्ख्या भावासह इतर मंडळी उतरली आहेत. त्यात आता अजित पवारांची सोशल मीडियावर होणारी बदनामी पाहून काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला.

युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत अजितदादांची सोशल मीडियात बदनामी करणाऱ्यांना आवर घाला अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असं आश्वासन दिले. सोशल मीडियात श्रीनिवास पवारांचे भाषण सध्या व्हायरल होतंय. त्यामुळे अजितदादा समर्थक जाब विचारण्यासाठी आले होते.

युगेंद्र पवार सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गावभेटी दौरा करत आहेत. तर पवार कुटुंबातील इतर मंडळीही सुप्रिया सुळेंच्या प्रचारात गुंतले. त्यात नुकतेच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काही गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या संवादात श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांमध्ये हा व्हिडिओ समोर आला. तेव्हापासून बारामतीत अजित पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे कार्यकर्ते यांच्यात कुरघोडी सुरू असल्याचं बोललं जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...