spot_img
अहमदनगरAhmednagar : व्यावसायिकांच्या परवाना शुल्कवरून शहरातील वातवरण तापले ! निर्णयच बेकायदेशीर असल्याचा...

Ahmednagar : व्यावसायिकांच्या परवाना शुल्कवरून शहरातील वातवरण तापले ! निर्णयच बेकायदेशीर असल्याचा दीप चव्हाण यांचा दावा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :
Ahmednagar News : शहरातील व्यावसायिकांकडून नव्याने परवाना शुल्क आकारण्या संदर्भात महापालिकेने शासनाची मंजूरी घेतलेली नाही. तर दर करची सूची प्रसिद्ध न करता व्यावसायिकांकडून हरकती देखील मागविण्यात आलेल्या नाहीत. हा विषय महापालिकेच्या बजेट मध्ये न घेता एकदम स्थायी समिती व महासभेत घेण्यात आला असून, परवाना शुल्क आकारण्याचा निर्णयच बेकायदेशीर असल्याचा खुलासा काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक दीप चव्हाण व नगरसेविका शिला चव्हाण यांनी केला आहे.

स्थायी समितीने 15 फेब्रुवारी 2023 रोजी व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यास संदर्भात ठराव मंजूर केला. तर 9 मे 2023 रोजीच्या महासभेत व्यवसाय परवाना शुल्कचा निर्णय एकदम आणण्यात आला. परवाना शुल्क आकारण्यासाठी 30 ते 40 आस्थापना नसून, 355 आस्थापनांचा समावेश यामध्ये आहे.

तर शासनाने सलून, गटई व मोची कामगारांना यामधून वगळलेले आहे. मात्र त्यावेळी 355 आस्थापनाची सूची महासभे समोर आली नाही. सूची नसल्याने नगरसेवकांनी चर्चा केली नाही. कोणत्या व्यवसायावर कर लावायचा या संदर्भात माहिती दिली गेली नाही.

महापालिका अधिनियम 99 च्या आधारे सन 2023-24 च्या बजेट मीटिंगमध्ये ही दर सूची सादर करणे आवश्‍यक होते. परंतु प्रशासन व्यापारी व नगरसेवकांची दिशाभूल करून हा कर व्यावसायिकांच्या माथी मारत आहे. बजेटच्या महासभेत परवाना शुल्कचा ठराव आलेला नव्हता. तो दोन महिन्यानंतर आला व दर करवर महासभेत चर्चा झाली नाही. या संदर्भात धोरण ठरविणे आवश्‍यक होते, असे झाले नाही. हा ठराव बजेटमध्ये घेतलेला नाही, याची प्रसिद्धीही केलेली नाही विशेष म्हणजे या संदर्भात शासनाची देखील मंजुरी घेतलेली नसल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप दीप चव्हाण यांनी केला आहे.

10 ऑक्टोंबर 2006 शासन निर्णयाने अकोले महापालिकेच्या धर्तीवर सदर शुल्क लावण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. अकोले मनपाने शासनाच्या नगर विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे शासनाची परवानगी घेतली आहे. मात्र अहमदनगर महापालिकेने या संदर्भात शासनाची मंजुरी घेतलेली नाही. दर सूचीचा ठराव शासनाकडे पाठविलेला नाही. व्यवसाय परवाना शुल्क महापालिकेला घेता येत नाही, कारण मुंबई दुकान स्थापना नोंदणी दाखला कायदा 1948 जिवंत आहे. तो शासनाने रद्द केलेला नाही, त्यानुसार सगळे व्यावसायिक कर भरतात. यामुळे पुन्हा डबल कर भरण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. मार्केट विभागाने या कराचा प्रस्ताव देऊन एक ते चार झोन मध्ये सर्व्हे करण्याचे स्पष्ट केले होते. त्याचे सर्व्हे देखील झालेला नाही.

अकोले महानगरपालिकेने महासभेच्या मान्यतेनंतर परवाना शुल्क लागू केला. तर परवाना शुल्क लागू करण्याबाबत शासनाची मंजुरी देखील घेतली. याप्रमाणे अहमदनगर महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हा शासन निर्णय फक्त अकोले महापालिके पुरता मर्यादीत आहे. शासनाने फक्त अकोले महापालिका पुरते शासन निर्णयात नमुद केले आहे. तो निर्णय आपल्या महापालिकेस लागू करण्यासाठी शासनाची मंजूरी आवश्‍यक आहे. तशी मंजुरी आपल्या महापालिकेने घेतलेली नाही. महापालिका अस्तित्वात आल्या पासून या संदर्भात कर का लावला नाही? तेंव्हा प्रशासनाला उत्पन्नाचे साधन दिसले नाही, यासाठी 20 वर्ष थांबल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

परवाना शुल्क संदर्भात स्थायी समिती व महासभेत ठराव झाला असल्यास तो लागू करू नये. नगरसेवकांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. 1 जानेवारीला प्रशासक येणार आहे. प्रशासकाने ठराव मान्य केला, तर हे व्यावसायिकांवर अन्याय होणार आहे. यासाठी हा ठराव मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 451 खाली शासनाकडे पाठवून विखंडित करण्याची मागणी दीप चव्हाण व नगरसेविका शिला चव्हाण यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...