spot_img
ब्रेकिंगUdhav Thackeray News: तो प्रश्न....? "उगाच हरभर्‍याच्या झाडावर ...." उद्धव ठाकरे यांनी...

Udhav Thackeray News: तो प्रश्न….? “उगाच हरभर्‍याच्या झाडावर ….” उद्धव ठाकरे यांनी दिलं उत्तर

spot_img

नवी दिल्ली-

Udhav Thackeray News: इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून तुम्ही स्वतःकडे कसे पाहता, असे विचारले असता ‘उबाठा’ नेते उद्धव ठाकरे यांनी ‘मला हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. माझ्यासमोर कोणतीच स्वप्ने नाहीत’ असे त्यांनी सांगितले.

उबाठाचे उद्धव ठाकरे सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इंडिया आघाडीचा समन्वयक, चेहरा ठरवण्याची वेळ आली आहे. बैठकीमध्ये याबाबत चर्चा होईल. पंतप्रधान पदाचा चेहरा नाही पण निमंत्रक कोणीतरी असावा. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी चेहरा हवा. अरविंद केजरीवाल हे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. जनता जे ठरवेल ते आम्ही करु.

उगाच अकलेचे तारे तोडण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांशी बोलू. सगळेजण देशातील लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत. मी देखील काही नावे सूचवणार आहे. मी मुख्यमंत्री पद जबाबदारी म्हणून स्वीकारावे लागले. माझ्यासमोर देशाची, महाराष्ट्राची जनता आहे. जनतेला काय हवे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घोडा मैदान जवळ आले आहे. सर्व सैनिक जमा झाले आहेत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी एक चेहरा आवश्यक आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यांचे काय करायचे ते त्यांनी करावे. जसे मध्य प्रदेशात शिवराज बदलले तसे मोदींना पण बदलू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...