spot_img
देशश्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यास मंदिर उभारणीचे खरे हिरो लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर...

श्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यास मंदिर उभारणीचे खरे हिरो लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना न येण्याची विनंती ? पण का? पहा..

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर होते. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आता मंदिर उभे राहिले असून पुढील महिन्यात राममंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. देशभर याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी नसतील अशी माहिती मिळाली आहे.

या दोघांचीही प्रकृती आणि वयामुळे राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे असे मंदिराच्या ट्रस्टने माहीत दिली. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, “दोघेही या कुटुंबातील वरिष्ठ आहेत आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली होती, जी दोघांनीही मान्य केली होती.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल.

निमंत्रितांची तपशीलवार यादी देताना राय म्हणाले की, अडवाणी आणि जोशी कदाचित आरोग्य आणि वयाशी संबंधित कारणांमुळे अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आडवाणी आता ९६ वर्षांचे आहेत आणि जोशी पुढच्या महिन्यात ९० वर्षांचे होतील.

श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण कोणाला?
माजी पंतप्रधान देवेगौडा, शंकराचार्य सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे ४००० ऋषी आणि २२०० इतर पाहुणेही असतील. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल. अध्यात्मिक गुरु दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, सिनेस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिद्ध उद्योगपती जसे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव, निलेश देसाई आणि इतर अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...