spot_img
देश२५ पैशांमध्ये १ किमी धावणारी 'ती' इलेक्ट्रिक बाइक! एकदा पहाच..

२५ पैशांमध्ये १ किमी धावणारी ‘ती’ इलेक्ट्रिक बाइक! एकदा पहाच..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
जर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात आलेल्या ओकायाच्या नवीन बाईककडे नक्की लक्ष द्या. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Okaya EV ने आज भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Okaya Ferrato Disruptor लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक २५ पैशांमध्ये १ किलोमीटर धावेल असा ओकायाचा दावा आहे.

प्रीमियम डीलरशिपमधून ओकाया ही ई-बाईक विकेल. यासाठी कंपनी १०० हून अधिक शोरूम उघडण्याचा विचार करत आहे. कंपनीने आगामी बाईकचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. भारतात या बाइकची एक्स-शोरूम किंमत १,५९,९९९रुपये आहे.

दोन्ही चाकांवर ABS सह डिस्क ब्रेक असतील. ई-बाईकमध्ये सस्पेंशनसाठी, पुढच्या बाजूला पारंपारिक टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनो-शॉक युनिट देण्यात आले आहे. याशिवाय बाईकमध्ये टायर हगर, स्प्लिट-सीट सेटअप आणि दोन्ही टोकांना आकर्षक एलईडी दिवे यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील.

ई-बाईकला पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर (PMSM) मिळेल, जी 6.37 kw ची पीक पॉवर आणि 228 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की Disruptor 95 kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. या बाइकमध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन मोड उपलब्ध असतील.

हँडलबारवर स्विच करून, तुम्ही तुमच्या गरजेनुसार मोड बदलू शकता.इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देण्यासाठी, त्याला LFP तंत्रज्ञानासह 3.97 kWh बॅटरी पॅक मिळेल. हा एक निश्चित बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 129 किलोमीटरचे अंतर कापेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...