नाशिक। नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीत तोंडावरच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्यासारखी बातमी समोर आली आहे. बड्या नेत्याला पोलिसांनी अचानक धाडलेल्या तडीपारीची नोटीशीमुळे एक झटका बसला आहे.
नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढल्यामुळे नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.
परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन कली होती.