spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: भयंकर! जमीनीचा वाद टोकाला गेला, तरुणांवर हल्ला केला, जोरात ओरडण्याचा...

Ahmednagar Crime: भयंकर! जमीनीचा वाद टोकाला गेला, तरुणांवर हल्ला केला, जोरात ओरडण्याचा आवाज आला अन् क्षणात..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२ रा. पिंपळगाव वाघा) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदरची घटना बुधवारी (दि. ६) दुपारी १२ ते साडेबाराच्या सुमारास झाली असून जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमिनाथ बाजीराव वाबळे (रा. पिंपळगाव वाघा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान सदरची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दादाभाऊ वाबळे हे सोमिनाथ यांना रस्ता करून देत नव्हते म्हणून सोमिनाथ याने दादाभाऊ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून व काडी लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहा. पोलीस निरीक्षक गिते अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...