spot_img
अहमदनगरभीषण! अहमदनगरच्या 'त्या' शिवारात अपघात; दोघे तरुण जागीच ठार

भीषण! अहमदनगरच्या ‘त्या’ शिवारात अपघात; दोघे तरुण जागीच ठार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर-सोलापूर रस्त्यावरील घोगरगाव शिवारात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. शेखर नवनाथ मिसाळ (वय ३४) आणि राजेश बबन थोरात (वय २६), दोघेही राहणार अंभोरा (ता. आष्टी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सदर अपघाताची घटना घोगरगाव शिवारातील बाह्यवळण रस्त्यावर भोस वस्ती चौकात घडली. कंटेनरने एका मोटारकारला धडक दिली. या भीषण अपघातात आष्टीचे शेखर मिसाळ आणि राजेश थोरात शंभर फुटांवर फेकले गेले. तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान शेखर मिसाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राजेश थोरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात या अपघाताची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘निळवंडे’ ५१ टक्के भरले; भंडारदरा कधी ‘ओव्हर फ्लो’ होणार, वाचा अपडेट

अकोले । नगर सहयाद्री:- भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आदी परिसरात दमदार आषाढ...

दुचाकी पेटली; युवकाचा होरपळून मृत्यू,’या’ महामार्गावरील घटना

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा-जामखेड महामार्गावर आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोमवारी दुपारी भीषण...

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...