Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. यासाठी आता पडताळणी केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. यात आतापर्यंत ज्या महिला दोन योजनांचा लाभ घेत आहे त्यांना आता फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता होणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फटका बसणार आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेत २.५३ कोटी महिला लाभार्थी आहेत.या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम ३७,९५० कोटी रुपये आहे. बजेटमध्ये ३४००० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. याआधी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता उत्पन्न चेक केले जाणार आहे. जर या पडताळणीत तुमचे उत्पन्न जास्त असल्याचे निदर्शनास आले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.