spot_img
अहमदनगरटेन्शन वाढवणारी बातमी! लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, एप्रिलचा हप्ता मिळणार की...

टेन्शन वाढवणारी बातमी! लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही?

spot_img

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपत आला आहे. तरीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समो आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेत महिना संपेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करु, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. मात्र, आज २९ तारीख आहे.एप्रिल महिना संपायला एकच दिवस उरला आहे. अद्याप एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि एप्रिलचा हप्ता एकत्र आला होता. त्यानंतर आता मे महिन्यातदेखील तसंच काहीसं होऊ शकतं. मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो.याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एका दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणे शक्य नाही. परंतु याबाबत निर्णय होऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. २१ ते ६० वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेच्या निकषात बसत नसाल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...