spot_img
ब्रेकिंग'तात्या' पुन्हा ठाकरेंसोबत! वसंत मोरे वंचितला रामराम ठोकणार? अहमदनगरममधील 'बडया' नेत्याचीही राहणार...

‘तात्या’ पुन्हा ठाकरेंसोबत! वसंत मोरे वंचितला रामराम ठोकणार? अहमदनगरममधील ‘बडया’ नेत्याचीही राहणार उपस्थिती, पहा..

spot_img

पुणे | नगर सहयाद्री
पुण्याचे वसंत मोरे लवकरच एका नवीन पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी पुण्यातून वंचितकडून तिकीट घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. आता ते लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात.

वसंत मोरे आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. वसंत मोरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि अहमदनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हेही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. परंतु, मविआने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून तिकीट मिळवलं, परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...