नगर सह्याद्री टीम : सर्वसाधारणपणे टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा विक्रीच्या बाबतीत एकमेकांच्या मागेपुढेच असतात. कधी Nexon ची जास्त विक्री होते तर कधी Brezza जास्त विकली जाते. परंतु नोव्हेंबर महिन्यात टाटा पंचने बाजी मारली आहे. टाटा पंचची सर्वाधिक विक्री झाली आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये या तिन्ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-3 SUV आहेत. टाटा नेक्सॉन नंबर-1, टाटा पंच नंबर-2 आणि मारुती ब्रेझा नंबर-3 वर आहे. गेल्या महिन्यात, Nexon च्या 14,916 युनिट्सची विक्री झाली. चच्या 14,383 युनिट्सची विक्री झाली तर ब्रेझाच्या 13,393 युनिट्सची विक्री झाली,
किती आहेत किमती?
Tata Nexon ची किंमत 8.10 लाख ते 15.50 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जाते. टाटा पंचची किंमत 6 लाख ते 9.52 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते. Brezza ची किंमत 8.29 लाख ते 14.14 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहेत.
Tata Nexon आणि Maruti Brezza या दोन्ही एकाच सेगमेंटमधील SUV आहेत तर Tata Punch ही SUV त्यांच्या खालच्या सेगमेंट मधील आहे. टाटा पंच मायक्रो SUV कॅटेगिरीमध्ये आहे. टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा प्रॉपर सब-4 मीटर एसयूव्ही आहे पंच देखील सब-4 मीटर SUV मध्ये असली तरी या दोन्हींपेक्षा ती छोटी आहे.