spot_img
मनोरंजनशिल्पा पाठोपाठ तमन्ना भाटिया अडचणीत! नेमकं प्रकरण काय?

शिल्पा पाठोपाठ तमन्ना भाटिया अडचणीत! नेमकं प्रकरण काय?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
बॉलीवूड अभिनेत्री एकापाठोपा एक कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत येत आहेत. अशातच आता अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले आहे. फेअरप्ले पवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबाबत तमन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्यामुळे फिल्म इंडस्टी्रमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तमन्नाच्या स्ट्रीमिंगमुळे वायकॉमचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तमन्नाला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्याले आहे.

सध्या आयपलएलचा सिझन सुरु आहे. सर्व टीमही तगडा परर्फाम दाखवत आहेत. तसेच दुसरीकडे अभिनेत्री तमन्ना भाटियाने फेअरप्लेचं प्रमोशन केलं त्यामुळे प्रकरणी केली जाणार आहे. तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. फेअरप्लेच्या प्रमोशनसाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला होता आणि त्यासाठी तिला किती पैसे मिळाले, यासंदर्भात तिची चौकशी केली जाणार आहे.

तमन्ना भाटियाआधी २३ एप्रिल रोजी अभिनेता संजय दत्तलाही या प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. संजय दत्ता सध्या मुंबईत नसल्याने तारीख व वेळ वाढवून मागितला आहे. वायकॉमने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तपास केला जात असून त्याचसंदर्भात तमन्ना भाटिया आणि संजय दत्त यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी रॅपर बादशाहचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. फेअरप्लेवर बेकायदेशीरपणे आयपीएलचं स्ट्रीमिंग केल्याने वायकॉमचं मोठं नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...