spot_img
अहमदनगररोहयोच्या कामांना स्थगिती द्या; आ. दाते यांची मागणी

रोहयोच्या कामांना स्थगिती द्या; आ. दाते यांची मागणी

spot_img

वाड्यावस्त्रयांवरील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहण्याची शक्यता
पारनेर | नगर सह्याद्री
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मग्रारोहयो) अंतर्गत पारनेर तालुक्यात तहसिल कार्यालयाच्या मार्फत मंजुरी देण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी रोहयो खात्याचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ. दाते यांच्या तक्रारीची दखल घेत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आ. दाते यांच्या तक्रारीमुळे तालुक्यातील गाव आणि वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आ. दाते यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तहसिल कार्यालयाने मंजूर केलेल्या विविध कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसिल कार्यालयाशी संबंधितांवर कारवाई केल्याचा उल्लेख आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. आमदार दाते यांनी नमूद केले की, तहसीलदार पारनेर यांनी प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेशानुसार ही कामे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मंजूर करण्यात आली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

त्यामुळे आयुक्त, मग्रारोहयो-महाराष्ट्र, जिल्हाधिकारी व जिल्हा कार्यक्रम समन्वयक (अहिल्यानगर), आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (अहिल्यानगर) यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने या प्रकरणी प्रचलित नियम व धोरणांनुसार योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे. चौकशीअंती तयार झालेला स्वयंस्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अहवाल ईमेलवर आणि उलट टपाली शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आमदार काशिनाथ दाते यांनाही या कारवाईबाबत अवगत करण्याची सूचना आहे. या प्रकरणामुळे पारनेर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक स्तरावर याबाबत तीव्र प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...