spot_img
महाराष्ट्रअजितदादांच्या प्रश्नांना सुप्रिया सुळे यांचे उत्तर, विरोधकांचा घेतला समाचार

अजितदादांच्या प्रश्नांना सुप्रिया सुळे यांचे उत्तर, विरोधकांचा घेतला समाचार

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
बारामती लोकसभा मतदार संघात बहीण- भावामध्ये टिकेचे वार होत आहेत. अजित दादांनी केलेल्या आरोपांना आता सुप्रिया सुळे यांच्याकडून उत्तर दिले जातं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न अजित पवार सभेतून विचारत आहेत. मात्र आपल्या भावाबद्दल कधीही न बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या सभेत मौन सोडलं. सध्या विरोधक कोणी लिहून दिलेलं भाषण वाचत आहे हे माहीत नाही. पण माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत सुळेंनी अजित पवारांना जाब विचारला आहे.

सुप्रिया सुळेंसाठी उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सभा घेतली. ही सभा पुण्यातल्या वारजे येथे पार पडली. सभेला काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उमेदवार सुप्रिया सुळे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख गाजानंद ठरकुडे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...