spot_img
ब्रेकिंगसूर्य ओकतोय आग! 'या' वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा

सूर्य ओकतोय आग! ‘या’ वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यभरात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून तापमान वाढू लागलं असून येत्या काही दिवसांत राज्यात वातावरण तापणार असल्याची चिन्हं आहेत. पुणे, मुंबई शहरांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. डोक्यावर सूर्य येण्या अगोदरच म्हणजेच दुपारी बारा वाजण्याअगोदरच अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार असल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांसाठी एक वेगळी चेतावणी हवामान विभागाने जारी केली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाण्यात किमान तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविली आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे तर उकाड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

तापमान वाढीमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. राज्यात सध्या सूर्य आग ओकत असून भरलेल्या रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवार म्हणजेच १५ एप्रिल आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. त्यादिवशी जिल्ह्यात तापमान चाळीशीपार गेले होते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.

आरोग्य विभागानं नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय. तसंच ज्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त असते, अशा वेळी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या शीतपेयांपासून दूर राहण्याचंही आवाहन केलंय. खबरदारीचा उपाय म्हणून, सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष बेड, द्रवपदार्थ आणि औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम, थेट तारीखच सांगितली

मुंबई / नगर सह्याद्री - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थेट...

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

पुणे / नगर सह्याद्री : राज्यभरातील थंडी आता गायब झाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांत...

तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

परभणी / नगर सह्याद्री - परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या...

महागाईपासून दिलासा नाहीच! रेपो रेट जैसे थे, EMI वर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - (RBI REPO Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या...