spot_img
ब्रेकिंगआला उन्हाळा, तब्येत 'अशी' सांभाळा...! राज्याचा पारा 'इतक्या' अंशावर, जाणून घ्या एका...

आला उन्हाळा, तब्येत ‘अशी’ सांभाळा…! राज्याचा पारा ‘इतक्या’ अंशावर, जाणून घ्या एका क्लिकवर

spot_img

नगर सह्याद्री टीम-
दिवसाचे कमाल तापमान आणि रात्री थंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता हिट वाढू लागली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आला उन्हाळा; तब्येत ‘अशी’ सांभाळा…!

डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडावे.

खोलीचे तापमान थंड ठेवावे.

मीठ, साखर व पाणी यांचे केलेले मिश्रण द्यावे.

लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्यावे.

बाहेर पडताना डोक्यावर टोपी रुमाल न्यावा.

उन्हाळ्यात कोणते पेय घ्यावे व कसे?

डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे.

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. 3.कोकम सरबताचे सेवन करावे.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता.

फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये.

पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही.

या काळात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.

टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.

थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.

नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
उन्हाळ्यात व्यायाम कसा करावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...