spot_img
ब्रेकिंग'सलमान खानची' सुपारी घेणाऱ्या 'सुक्खा कालूयाला' बेड्या

‘सलमान खानची’ सुपारी घेणाऱ्या ‘सुक्खा कालूयाला’ बेड्या

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुंबई मध्ये १२ ऑक्टोबरला बाबा सिद्धी यांची खेरवाडी येथे गोळ्या झाडून करण्यात हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आता सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यातच सलमान खानच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाला. सलमान खान याला मारण्याची सुपारी घेणाऱ्या ‘सुक्खा कालूयाला’ पानिपत येथून अटक करण्यात आली होती. गुन्हेगाराला हरियाणा येथून नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रात आणलं आहे.

पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली आहे. सुक्खा कालूयाला रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज सुक्खा कालूया याला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणे आणि जीवे मारण्याची सुपारी घेतल्या प्रकरणी सुक्खा कालूयाला वर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुक्खा कालूया हा अनेक महिन्यापासून फरार होता. सुक्खा कालूयाला हा बिष्णोई गँगचा शार्प शुटर असल्याचे समोर आले आहे. सुक्खा कालूयाला अटक केल्याने सलमान खान प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता.

अभिनेता सलमान खानला याआधी पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊस वर जात असताना त्याला लक्ष्य करण्याचा प्लॅन करण्यात आला होता. त्यानंतरच एप्रिल 2024 मध्ये त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला आहे. आता पुन्हा धमकी त्याला येत आहे. त्याचसोबत वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज आला आहे. त्यात ‘लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची केली मागणी’ केली आहे.खंडणी न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करण्याचा धमकीचा उल्लेख या धमकीत केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...