spot_img
अहमदनगर'सुजित झावरे पाटील यांचा शनिवारी कार्यकर्ता संवाद मेळावा'

‘सुजित झावरे पाटील यांचा शनिवारी कार्यकर्ता संवाद मेळावा’

spot_img

वाढदिवसानिमित्त पारनेरमध्ये शनिवारी आयोजन
पारनेर। नगर सहयाद्री
पारनेर तालुयातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील उमदे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २३ मार्चला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारनेरमधील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात ते काय भूमिका घेतात हे आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने महत्वाचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची पारनेर मतदार संघात नेहमीच राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पकड राहिली आहे. सत्तेत असताना व सत्ता नसतानाही त्यांनी विकासाची कास कधी सोडली नाही. त्यांनी पारनेरमध्ये अनेक विकासकामे केली. त्यांचे वडील वसंतराव झावरे पाटील हे देखील आमदार होते.

त्यांची सामान्य लोकांशी नाळ जोडली गेली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत सुजित झावरे पाटील यांनी ही जनसामान्यांशी असणारी नाळ कायम ठेवली. जलसंवर्धनाबाबत त्यांनी विशेष कार्य केले. पारनेरमधील विविध विकासकामे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कामांमध्ये आजही त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

नेहमीच जनतेत असल्याने सुजित झावरे पाटील यांनी येत्या २३ तारखेला पारनेरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. ते यावेळी कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत. यावेळी ते कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणे देखील औत्सुयाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...