spot_img
अहमदनगरलोकसभा निवडणूक का लढवायचीय हे सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले; पाच वर्षात...

लोकसभा निवडणूक का लढवायचीय हे सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले; पाच वर्षात…

spot_img

विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील
राहुरी / नगर सह्याद्री :
केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.

भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य; ‘या’ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका,...

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....