spot_img
ब्रेकिंग'सुदर्शन कोतकर ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न पुर्ण करेल'

‘सुदर्शन कोतकर ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न पुर्ण करेल’

spot_img

आमदार नीलेश लंके, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगर | नगर सह्याद्री –

पै. सुदर्शन कोतकर जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी गदेचे स्वप्न पुर्ण करेल असा विश्वास डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

नगरमध्ये नुकताच झालेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी मध्ये नगर जिल्ह्याकडून सुदर्शन कोतकर प्रतिनिधित्व करणार आहे. पै. सुदर्शन कोतकर यांची निवड झाल्याबद्दल लोकनेते आमदार निलेश लंके व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते पै. सुदर्शन कोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांंनी विश्वास व्यक्त केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अहमदनगर जिल्हा हा कुस्ती पटुंचा जिल्हा असून नगरला नामवंत मल्लांची मोठी परंपरा आहे. पै. सुदर्शन यांच्यासारखे मल्ल जिल्ह्याचे नाव देशभरात झळकवत आहेत. याचा अभिमान असून पै. सुदर्शन कोतकर आगामी काळात मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पै. सुदर्शन कोतकर यांचे मोठे बंधू युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक संग्राम बबनराव शेळके, पारनेर नगराध्यक्ष नितीन आडसूळ, राष्ट्रवादीचे नेते अर्जूनशेठ भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक भूषण शेलार, पै. सागर गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...

सोलापूर हादरलं! थायलंडच्या भूकंपानंतर महाराष्ट्रातही 3 ठिकाणी धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर / नगर सह्याद्री - गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये...

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सुनील चोभे | नगर सह्याद्री जिल्हा परिषद...

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...