spot_img
ब्रेकिंग'महामोर्चा' ला यश!! मुबंईत विजय सभा, 'सर्व खुट्या उपटल्या, विरोधकांना..' जरांगे पाटील

‘महामोर्चा’ ला यश!! मुबंईत विजय सभा, ‘सर्व खुट्या उपटल्या, विरोधकांना..’ जरांगे पाटील

spot_img

मुबंई । नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचा जालन्यातील आंतरवाली सराटी येथून निघालेली ‘महामोर्चा’ ला यश आले आहे. लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे-पाटील आपल्या मागण्यावर ठाम होते. मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे.

बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत, त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसंच मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते याबाबतचा अध्यादेश जरांगे यांच्याकडे सोपवला जाणार आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असून जरांगे यांची विजयी सभा पार पडणार आहे.

सर्व खुट्या उपटल्या: मनोज जराजे पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चागले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला. विरोध करणाऱ्याना आपला विरोध होता. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्युस स्वीकारणार आहे. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? होकार मिळाल्यावर मी निर्णय घेतला आहे. सर्व खुट्या उपटल्या आहे. आपल्या अपेक्षित सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. गुलाल उधलून आपण गावी वापस जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...