श्रीरामपूर | नगर सह्याद्री
जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी महाराष्ट्राला विळाखा घातका आहे. जिल्हात अनेक धर्मांतराच्या घटना सातत्याने घडत आहे. अनेक मोर्चे काढुन देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होत नसेल तर हिंदु धर्मात शास्त्रसह शस्राचा अभ्यास देखील शिकवला जात असल्याचे प्रखड विचार राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी मांडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहीद भगतसींग चौकात हिंदूधर्मसभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मंगल भक्त सेवा मंडळाचे संस्थापक विश्वेश्वर स्वामी (राजाभाऊ) कोठरी, शिवचरित्रकार नवनाथ महाराज म्हस्के, स्वारद फाऊंडेशनच्या संस्थापिका स्वातीताई शरद मोहळ, राहुल महाराज पोकळे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग उपस्थितीत होते. यावेळी ते बोलत होते.
बेग म्हणाले, साधुसंत आणि छत्तपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत लोकांना जिहादी प्रवृत्तीला सामोरे जावे लागत आहे. अनेक शांततेचे मोर्चे काढुन देखील लव्ह जिहाद विरोधी कायद्यांची निर्मिती होत नाही. नगर जिल्ह्यात अनेक धर्मांतराच्या घटना सातत्याने घ घडत आहे. हिंदु धर्म विरोधी असणार्या वक्फ बोर्डच्या कायद्याच्या माध्यमातुन अनेक एकरवर जिहाद्यांनी ताबा केला आहे.
उत्तर नगरची परिस्थिती पहिली तर २४४ व्या एकर जागेला विळाखा घातला आहे. असे म्हणत त्यांनी सोनई, कोपरगाव श्रीरामपूर, येथे घडलेल्या घटनेचा निषेद व्यक्त करत प्रशासनाने केलेल्या कारवाई बाबत आभार मानले. मुलींनी सतर्क रहावे वेळे प्रसंगी माता चडिकांचे रूप धारण करावे. असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना भारत रत्न देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाचे नागरिक, महिला वर्ग व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहा वर्षांपासून भारताचे हिंदुस्थानात रूपांतर
छत्तपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ जयंती निम्मित राष्ट्रीय श्रीराम संघाने विशाल अशा महाहिंदूधर्मे सभेचे आयोजन केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारताचे हिंदुस्थानात रूपांतर होतांना दिसत असल्यामुळेच ५५० वर्षांच्या वनवासानंतर राम पुन्हा २२ जानेवारीला अयोध्या दरबारात विराजमान झाले आहे. नुसता कपाळी टिळा आणि वाढलेली दाढीमुळे कोणी शिवभक्त होत नसून शिवरायांच्या तत्वांचा आणि विचारांचा वारसा शिवभक्तांनी जपत कार्ये केले पाहिजे.
– विश्वेश्वर स्वामी (राजाभाऊ) कोठरी
(संस्थापक, मंगल भक्त सेवा मंडळ)