spot_img
महाराष्ट्र‘पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त‘

‘पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त‘

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
मागील काही दिवसांपासून राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढल्या आहेत. तलाठी भरती प्रकरण ताजे असतानाच बीडमध्ये बुधवारी (ता. २८) पुरवठा निरीक्षण पदाचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत विधानभवनाबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता. २९) विधानभवनाच्या पायर्‍यांवर लक्षवेधी आंदोलन केले. मराज्यात सतत होणार्‍या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्तफ असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक विविध मु्द्दे बाहेर काढत आहेत. अशातच पेपरफुटीच्या प्रकरणावरून गुरुवारी विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...