मुंबई | नगर सह्याद्री
मागील काही दिवसांपासून राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढल्या आहेत. तलाठी भरती प्रकरण ताजे असतानाच बीडमध्ये बुधवारी (ता. २८) पुरवठा निरीक्षण पदाचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत विधानभवनाबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता. २९) विधानभवनाच्या पायर्यांवर लक्षवेधी आंदोलन केले. मराज्यात सतत होणार्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्तफ असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक विविध मु्द्दे बाहेर काढत आहेत. अशातच पेपरफुटीच्या प्रकरणावरून गुरुवारी विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.