spot_img
अहमदनगरAhmednagar News : व्यवसायिक परवाना शुल्क वसुलीला व्यापारी असोसिएशन, सलून चालक-मालक संघटनेचा...

Ahmednagar News : व्यवसायिक परवाना शुल्क वसुलीला व्यापारी असोसिएशन, सलून चालक-मालक संघटनेचा तीव्र विरोध ; ठराव विखंडित करण्यासाठी काँग्रेसचा पाठपुरावा

spot_img

व्यापारी, दुकानदारांनी “जवाब दो अभियान” राबवावे – किरण काळेंचे आवाहन 
अहमदनगर / नगर सह्याद्री –
Ahmednagar News : व्यवसायिक परवाना शुल्क वसुली अंमलबजावणी वरून व्यापारी, दुकानांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. सर्व स्तरातून याला आता मोठा विरोध होऊ लागला आहे. अहमदनगर कापड व्यापारी असोसिएशन, अहमदनगर सलून चालक-मालक संघटनेने देखील याला कडाडून विरोध केला आहे. नगरसेवकांच्या महासभेत पारित करण्यात आलेला ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवण्याची मागणी काँग्रेस मनपा आयुक्तांकडे करणार असून व्यापारी, दुकानदारांनी आपापल्या प्रभागातील नगरसेवकांना आपण हा ठराव मंजूर केलाच कसा यासाठी जाब विचारणारे जवाब दो अभियान राबवावे, असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे [Kiran Kale] यांनी केले आहे.

सलग तिसऱ्या दिवशी व्यवसायिकांच्या संघटनांशी संवाद मोहिमेदरम्यान भावना जाणून घेत असताना काळे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, विलास उबाळे, अल्तमश जरीवाला, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विकास भिंगारदिवे आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष शामसुंदर सारडा, उपाध्यक्ष सचिन चोपडा, सेक्रेटरी राजेंद्र गांधी, जॉईंट सेक्रेटरी विजय गांधी, खजिनदार विजय मुनोत, रजनीकांत गांधी, विजय गुगळे, रसिकला चोपडा, सतीश सुपेकर, ओमप्रकाश इटारा, विनोद विनोद अनिलकुमार सुराणा, संजयकुमार भंडारी, राहुल कटारिया, मुकेश अरोरा, हिम्मतलाल शींगी, सचिन पेटकर आदींनी संघटनेच्या वतीने जोरदार विरोध केला आहे

यावेळी बोलताना सचिव राजेंद्र गांधी म्हणाले की, मनपाने नगरची बाजारपेठ पूर्णपणे मोडीत काढण्याचा पण केलेला दिसतो आहे. यापूर्वी देखील मनपाने व्यापाऱ्यांवर नेहमीच अन्याय केला आहे. एकेकाळी नगरची बाजारपेठ भारतभर प्रसिद्ध होती. देशभरातून व्यापारी, ग्राहक येथे खरेदीसाठी यायचे. परंतु व्यापाऱ्यांना अनेक अडथळे आणले गेल्यामुळे बाजारपेठ भकास होत चालली आहे. त्यात आता हे नवीन शुल्क आकारून कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. आमच्या असोसिएशनचा शंभर वर्षांचा इतिहास आहे. मनपाच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो. किरण काळे यांनी व्यापाऱ्यांसाठी घेतली भूमिका स्वागतार्ह आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे.

अहमदनगर सलून चालक-मालक संघटनेने देखील याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस शिष्टमंडाच्या संवाद मोहिमेदरम्यान संघटनेचे अध्यक्ष जनार्दन वाघ बोलताना म्हणाले की, सलून व्यावसायिक नव्वद टक्के भाडेतत्त्वावर काम करतात. मनपा कर, लाईट बिल आम्हाला परवडत नाही. कोरोना काळापासून सलून चालक अडचणीत आले आहेत. शहरात आमचे सुमारे बाराशे ते पंधराशे दुकानदार आहेत. आमचा मनपाच्या या निर्णयाला तीव्र विरोध असून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. संघटनेच्या वतीने सचिव विकास मदने, उपाध्यक्ष सत्तार अली शेख, जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, संजय मदने, शरद दळवी, नंदकुमार मोरे, अजय कदम आदींनी देखिल आपल्या विरोध नोंदविला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...