spot_img
ब्रेकिंगअजबच! 'सिबिल स्कोअर' खराब असल्याने मोडलं लग्न..

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

spot_img

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा विचार करतात. सिबिल चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबिल खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो. वेळप्रसंगी खराब सिबिल स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, कर्जव्यवहारांशी संबंधित असलेल्या या ‘सिबिल’मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात ही घटना घडली आहे.

मूर्तिजापूर शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुला-मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. एक-दोन बैठकी झाल्या. दोन्हीकडच्या जवळच्या नातेवाइकांनाही नियोजित वधू-वर दाखविण्याचे कार्यक्रम झाले. पसंती ठरली. विवाह कसा व कुठे करायचा, याबाबत चर्चा झाली. दरम्यान, या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली. या बैठकीला मुलीचा मामासुद्धा उपस्थित होता. त्याने मुलाचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. सिबिल स्कोअर तपासला गेला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुलाचा सिबिल स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले.

मुलाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले आहे, याचा रीतसर तपशील सिबिलद्वारे सर्वांपुढे आला. नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले. इतर सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर आपली मुलगी त्याला का द्यावी, असा विचार मामाने मांडला. मुलीकडच्या इतर नातेवाइकांनी त्याला दुजोरा दिला आणि अंतिम बोलणीपर्यंत आलेला विवाह मोडण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सख्खा भाऊ पक्का वैरी!, मोठ्या भावानं धाकट्या भावाचा गळा घोटला!,’धक्कादायक’ वास्तव समोर..

Crime News: सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस...

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...