नवी दिल्ली / नगर सह्याद्री : राजकीय वलयातून मोठी बातमी आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे वृत्त आले आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ सुरु आहे. ते सध्या बिहारमध्ये आहेत.
या यात्रेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण होऊन त्यांच्या कारचे नुकसान झाले. यात ते थोडक्यात बचावले आहेत.राहुल गांधी कारमधून उतरुन बसमध्ये बसले. त्यानंतर प्रशासनाने लोकांना शांत केलं. राहुल गांधी यांची यात्रा आज बिहारमधून बंगालमध्ये प्रवेश करेल.
राहुल यांची ही यात्रा मिर्चाईबारी डीएस कॉलेजकडून लाभामध्ये जनसंवाद करेल. त्यानंतर बंगालच्या दिशेने प्रस्थान करेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंजमार्गे बिहारमध्ये प्रवेश केला होता. बिहारमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली.
यात गाडीच्या काचा फुटल्या. प्रदेश काँग्रेसचा दावा आहे. बिहारच्या भूमीवर अन्यायाविरोधात सुरु असलेल्या न्यायाच्या या महायात्रेला जनतेच भरपूर प्रेम आणि समर्थन मिळतेय असं राहुल गांधी म्हणाले.