spot_img
अहमदनगरपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धा; असे...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धा; असे आहे नियोजन

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
पदवीधर प्रकोष्ठ ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

“धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!”
केवळ एक राजमाता नव्हे, तर समाजहितासाठी झटणारी एक जागृत सेविका होत्या त्या. काशीपासून रामेश्वरापर्यंत त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी आणि धर्मशाळांची उभारणी केली – त्या केवळ इमारती नव्हत्या, तर संस्कृतीच्या आधारस्तंभ होत्या.
त्यांच्या कार्याचा विस्तार हा केवळ राज्यकारभारापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात धर्म, न्याय, आणि मानवसेवेचे मूल्य होते. अशा या आदर्श स्त्रीशक्तीला आज आपण मानाचा मुजरा करतो कारण अहिल्याबाई म्हणजे दिव्यतेची आणि नेतृत्वाची जिवंत मूर्ती!

याच दिव्यत्वाला नमन करण्यासाठी त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ च्या वतीने भव्य अशा राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
१. भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
२. मराठी, हिंदी आणि इंग्रजी ही तिन्ही माध्यम
३. भव्य दिव्य पारितोषिके
४. सर्व सहभागींना सहभागीत्व प्रमाणपत्र
५. सर्व वयोगटांना संधी
६. कोणत्याही स्पर्धकाला केवळ एकाच स्पर्धेत भाग घेता येईल.

महत्त्वाच्या तारखा
१. दि.२५ मे ते ३० मे २०२५ – नाव नोंदणी आणि दिलेल्या लिंक वर निबंध स्पर्धेचे पीडीएफ पाठविणे.
२. दि. ०५ जून २०२५ पदवीधर प्रकोष्टाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर
३. पारितोषिक वितरणाची तारीख विजेत्यांना कळविण्यात येईल आणि सहभागीना ३० जून २०२५ च्या आत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
*नाव नोंदणीसाठी लिंक*
https://forms.gle/1nQxtXzF93zs3tpQ6
*अधिक माहितीसाठी संपर्क*
9821704350, 9082528568,
80827 62162

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...