spot_img
ब्रेकिंगBusiness Idea: आजच सुरु करा 'हा' व्यवसाय! दरमहा 10 लाखांची कमाई, एकदा...

Business Idea: आजच सुरु करा ‘हा’ व्यवसाय! दरमहा 10 लाखांची कमाई, एकदा पहाच..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
हल्ली तरुणांचा व्यवसाय करण्याकडे कल वाढत चालला आहे. आजच्या तरुणाईला छोटासा का असेना पण स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हीही बिझनेस प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत, जी तुम्ही गावात आणि शहरात कुठेही करू शकता.

या व्यवसायात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकसान होण्याची शक्यता नगण्य आहे. मागणी एवढी जास्त आहे की लाखो रुपये सहज मिळू शकतात. चला जाणून घेऊया या बिझनेसबद्दल सर्व काही. हा व्यवसाय आहे- कार्डबोर्ड बॉक्स अर्थात पुठ्याचा बॉक्स बनवण्याचा व्यवसाय.

नुकसान होण्याची शक्यता कमीच
हल्ली पुठ्ठ्याच्या पेट्यांची मागणी खूप वाढली आहे. दुकान असो वा घर, ते आवश्यक आहे. प्रत्येक लहान-मोठी वस्तू पॅक करण्यासाठी पुठ्ठ्याची बॉक्स आवश्यक असतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही हंगाम नसतो. दर महिन्याला प्रत्येक हंगामात त्याला मागणी असते. त्यामुळे या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता कमी आहे. ऑनलाइन बिझनेसमध्ये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे.

कार्डबोर्ड कुठे वापरला जातो?
एकसमान पॅकिंग आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी पुठ्ठ्याचा वापर केला जातो. हे जाड आवरण (पुठ्ठे) बांधणीच्या कामासाठी अर्थात पॅकिंगसाठी वापरले जाते. पुस्तकांच्या मुखपृष्ठासाठीही याचा वापर केला जातो. अवजड उत्पादनांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यासाठी क्राफ्ट पेपर हा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. सुमारे ४० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे. वापरण्यात येणाऱ्या क्राफ्ट पेपरचा दर्जा जितका चांगला असेल तितक्या चांगल्या दर्जाचे बॉक्स बनवले जातात.

किती जागा आणि कोणती मशीन लागेल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सुमारे 5000 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय त्यासाठी प्लांट लावावा लागेल. मग, माल ठेवण्यासाठी गोदाम देखील आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या मशीन्सची आवश्यकता असेल. एक अर्ध स्वयंचलित मशीन आणि दुसरे पूर्णपणे स्वयंचलित मशीन.

तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?
तुम्ही तो लहान व्यवसाय म्हणून सुरू करू शकता, तसेच तो मोठ्या स्तरावरही सुरू केला जाऊ शकतो. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला किमान 20 लाख रुपये गुंतवावे लागतील. वास्तविक, यासाठी सेमी-ऑटोमॅटिक मशीनची आवश्यकता असेल. त्याच वेळी, पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे सुरू करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंत खर्च केला जाऊ शकतो.

बंपर कमाई होईल
या व्यवसायात तुमचा नफाही प्रचंड असेल. वास्तविक, या व्यवसायाची मागणी खूप वाढली आहे, त्यामुळे त्यात नफ्याचे प्रमाणही जास्त आहे. जर तुम्ही हे अधिक चांगल्या पद्धतीने केले आणि चांगले ग्राहक बनवले, तर हा व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा 10 लाख रुपये सहज कमवू शकता.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...