spot_img
अहमदनगरसैनिक बँकेवर व्यवहारेंचा चौकार; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

सैनिक बँकेवर व्यवहारेंचा चौकार; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री –
माजी सैनिकांची कामधेनू असलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली आहे. सैनिक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत झाली असून १७ संचालकापैकी ११ जागांची निवड ही बिनविरोध करण्यात आली होती. पारनेर तालुका सैनिक बँकेच्या सहा जागांसाठी सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये लढत होऊन रविवारी मतदान पार पडले. सोमवारी सकाळी पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात मतमोजणी पार पडली असून विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्या सहकार पॅनलचे सहाही उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दोन दिवस ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये बैठकावर बैठका घेत बिनविरोध करण्याची विनंती सर्वांना केली होती. परंतु १७ पैकी ११ जागा बिनविरोध निवड झाली होती. बिनविरोध संचालकामध्ये कारभारी भाऊसाहेब पोटघन, शिवाजी बाबुराव सुकाळे, संतोष भिमाजी गंधाडे, संतोष तुकाराम मापारी, जयसिंग सदाशिव मापारी, संजय दत्तू तरटे, धर्माजी बहिरू मते, अशोक बाळासाहेब खोसे, बाळासाहेब हरिभाऊ नरसाळे ,महिला राखीव मतदार संघातून लीलावती प्रताप गायकवाड, अनिता भाऊसाहेब भोगाडे यांचा समावेश आहे. तर उर्वरित ६ जागांसाठी मतमोजणी झाल्यानंतर‌इतर मागास प्रवर्गातून शिवाजी तुकाराम व्यवहारे ( २०६३ मते), भटक्या युक्त जाती जमाती प्रवर्गातून बाळासाहेब बबनराव हिलाळ ( २१४६), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मधुकर सावळेराम साळवी ( २०७१ मते), पारनेर तालुका कार्यक्षेत्र वगळून राजेंद्र हनुमंतराव जगताप राहणार – कर्जत ( २०३१ मते) हरिभाऊ पोपट खेडकर राहणार, श्रीगोंदा ( २००५ मते‌)‌, दत्तात्रय नामदेवराव सोले पाटील राहणार – जामखेड ( १९४२) मते मिळवून विजयी झाले आहेत. या विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यासह नगराध्यक्ष अडसूळ, सभापती बाबाजी तरटे, डॉक्टर बाळासाहेब कावरे, उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, सभापती योगेश मते ,सभापती भूषण शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

व्यवहारेंचा चौकार..
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहार यांनी विशेष प्रयत्न केले असून अनेक न्यायालयीन लढाया व आरोंपांना वेळोवेळी त्यांना सामोरे जावे लागले. तरीपण बँकेच्या हिताचा विचार करत गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांचा चौकार अशी घोषणा समर्थकांनी दिली.

पराभव मान्य, पण मताधिक्य आमचा उत्साह वाढवणारे
सैनिक बँक निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. परंतु बँकेवर आपलेच वर्चस्व रहावे म्हणून चेअरमन शिवाजी व्यवहारे व काही कर्मचारी यांनी लोकशाहीची हत्या करून एकाच दिवशी केलेल्या १४०० नातेवाईक सभासद यामुळेच व्यवहारे यांचा विजय झालेला आहे. निवडुन आलेल्या सहा उमेदवारांपैकी स्वतः व्यवहारे यांना सर्वात कमी मते आहेत. यावरून त्यांच्यावर कारभारावर सभासद यांची असणारी नाराजी स्पष्ट होते. तर आमच्या परिवर्तन मंडळाला बँकेच्या जडणघडणीत योगदान असणाऱ्या माजी सैनिक व सर्वसामान्य शेतकरी सभासदांनी आम्हाला बँक वाचवावी म्हणून चांगली मते देत साथ दिली आहे. जर व्यवहारे यांनी स्वतःचे १४०० नातेवाईक सभासद केले नसते तर आज निकाल वेगळा लागला असता. आमचा जरी पराभव झाला असला तरी इतर मागास प्रवर्गात दत्तात्रय भुजबळ यांनी विद्यमान चेअरमन शिवाजी व्यवाहारे यांना दिलेली कडवी लढत तसेच श्रीगोंदा व जामखेड तालुक्यात मिळालेले मताधिक्य आमचा उत्साह वाढवणारे आहे. यापूढे सैनिकांची अस्मिता असणारी बँक व्यवस्थित चालावी म्हणून सत्ताधारी यांना साथ देऊ तर चुकीच्या गोष्टीना प्रखर विरोध करीत राहू- विक्रमसिंह कळमकर नेते, सैनिक बँक परिवर्तन मंडळ

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...