spot_img
अहमदनगरश्रीगोंद्यात मोठी चोरी; ३० लाखांचा ऐवज चोरीला, चोरटे कॅमेऱ्यात कैद, ग्रामस्थ आक्रमक

श्रीगोंद्यात मोठी चोरी; ३० लाखांचा ऐवज चोरीला, चोरटे कॅमेऱ्यात कैद, ग्रामस्थ आक्रमक

spot_img

पारगाव येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी / सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन नेले चोरुन
श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे ५० किलो अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन चोरुन नेले. दरम्यान, श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली. या सभेमध्ये ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत चोरट्यांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी अशी एकमुखी मागणी केली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे ५० किलो वजनाचे अंदाजे ३० लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन नेले.

या घटनेचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथील प्रसिध्द व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असताना त्यांना दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेत मंदिरात जाऊन पाहिल्यावर मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिस ठाण्यात देत गावकऱ्यांना गोळा केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मंदिरात धाव घेत पाहणी केली. घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पुढील तपासासाठी श्वान पथक, अंगुली मुद्रा तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले.

तसेच घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी धाव घेत परिसरातील सीसीटिव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला असून आरोपी लवकरच जेरबंद होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...