झारखंड / नगर सह्याद्री : जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी काल मुख्यमंत्रिदपदाचा राजिनामा दिल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. चंपई सोरेन यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. त्यांनीही मंख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी गटातील चार आमदारांचे फोन बंद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
बिहारनंतर आता झारखंडमध्येही राजकीय खेळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी पक्षाला आमदारांकडून घोडे बाजाराची भीती वाटत आहे. दरम्यान, चंपई सोरेन यांना अद्याप राजभवनकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही.
तर चंपई सोरेन यांनी ४३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राजभवनाला पाठवले आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या चार आमदारांचे फोन बंद आहेत. राजकीय उलथापालथीच्या भीतीने सुमारे ३५ आमदारांना हैदराबाद किंवा बंगळुरूला पाठवण्याची तयारी सुरू असून, त्यासाठी दोन चार्टर विमाने तयार आहेत.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमधील राजकीय उलथापालथीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय चंपई सोरेन यांच्या मुख्यमंत्रिपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेएमएमने चंपई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे.