spot_img
अहमदनगरसोनईचा अभिमन्यु करायचा असं काही..; कोतवाली पोलिसांची नजर, क्षणात पडल्या बेड्या!

सोनईचा अभिमन्यु करायचा असं काही..; कोतवाली पोलिसांची नजर, क्षणात पडल्या बेड्या!

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरात चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अभिमन्यु विलास कुसळकर ( वय 23 वर्षे, रा. सोनई, ता. नेवासा ) असे आरोपीचे नाव आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाशिवरात्रीच्या दिवशी चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी दुचाकीवरून शहरात पुन्हा गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेत कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने आरोपीस मोठ्या शिताफीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने साथीदार अजय रुस्तम शिंदे ( रा. कोठला, अहिल्यानगर ) याचेसह २० मे २०२४ रोजी दाखल गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. योगिता कोकाटे, म.पो.हे.कॉ. रोहीणी दरंदले, पो.हे.कॉ. विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, विशाल दळवी, संदिप पितळे, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, राम हंडाळ व मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु,पो.कॉ.नितीन शिंदे यांच्या पथकाने बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Honda Shine नव्या लूकसह लॉन्च! परवडणारी किंमत, अतिरिक्त फीचर्स..

2025 Honda Shine: Honda Shine 100 चा नवीन 2025 अवतार भारतीय बाजारात सादर करण्यात...

पोलिसांना मिळालेली खबर पक्की निघाली, ‘स्प्रिंग ब्रुक लॉज’ मध्ये…धक्कादायक प्रकार

Crime News कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! एफआरपी बाबत कोर्टाचा आदेश..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या नशिबात दडलंय काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...