spot_img
ब्रेकिंगगुलीगत सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचा टिझर रिलीज!

गुलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा टिझर रिलीज!

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
बिग बॉस मराठी सिझन 5 च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणनेआपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच “झापुक झुपूक” ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” चा धमाकेदार टिझर प्रदर्शित झालाय.

सूरजचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ज्यात तो ‘म्हणतो मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे’, असाच त्याच्या “झापुक झुपूक” सिनेमाचा टिझर आहे. दमदार आणि गाजवणारा. टिझरमध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पहायला मिळते, सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरज ने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे.

एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या ह्या साध्या भोळ्या सूरज साठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हल्लीच सूरज ने जेजुरीच्या खंडोबा देवाचे, आईमरी मातेचे आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशन ची जोरदार सुरुवात केली आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित “झापुक झुपूक” हा सिनेमा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....