spot_img
ब्रेकिंग..तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? पंकजा मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज...

..तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सणसणीत टोला

spot_img

बीड । नगर सह्यद्री
तुम्ही आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील तुम्हाला? मराठे जातीयवादी असते तर मुंडे कुटुंबीय लोकप्रतिनिधी झाले असते का? तुम्ही आहात तरी किती? असा सवाल सहर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jaraje Patil ) यांनी पंकजा मुंडे यांना केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलानासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jaraje Patil ) यांनी दि. ११ मे रोजी बीड मधील माजलगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठे जातीयवादी असल्याचा आरोपवार प्रतिउत्तर दिले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठे जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्ही जातीयवादी असतो तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे मंत्री, खासदार झालेच नसते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुडे हे आमदार झाले नसते, प्रीतम मुंडे खासदार झाल्याच नसत्या.

तुम्ही जर मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे तुम्हाला कसे निवडून देतील? तुम्ही आहात तरी किती? आम्ही एकटे मराठेच साडेसहा लाख आहोत, त्यात मुस्लीम तीन लाख मिसळले तर खाली काय राहते?, असा सवाल जरांगेंनी केला आहे.

माझ्या जिल्ह्यात जातिवादाचे विषारी राजकारण
खासदार विखेंच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी माझ्या जिल्ह्यात जातिवादाचे विषारी राजकारण होत आहे, पण मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. एका मराठा बांधवासाठी (डॉ. सुजय विखे) मी येथे आली आहे. माझ्या जिल्ह्यातील लोकांनी ते पहावे. जातपात, धर्म न मानणाऱ्या पक्षात आम्ही आहोत, असे प्रतिपादन केले होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...