अहमदनगर | नगर सह्याद्री
खातेदाराकडून बँकेच्या शिपाईला मारहाण केल्याचा प्रकार शहरातील नामांकित बँकेत घडला आहे. याप्रकरणी श्रीनिवास रवींद्र अरकल (वय, ३१ वर्षे रा. नित्यसेवा सोसायटी पाईपलाइन रोड, अ. नगर ) यांच्या फिर्यादीवरून खातेदार नावेद सलमान शेख (रा. कोठला अ. नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: फिर्यादी शहरातील चौपाटी कारंजा परिसरात असणार्या एका नामांकित बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर नावेद सलमान शेख हे बँकेचे खातेदार आहे. दि.५ एप्रिल रोजी चार वाजण्याच्या सुमारास बँकेची खातेधारकासाठी असलेली वेळ संपल्याने फिर्यादी यांनी बँकेचा दरवाजा बंद केला असता खातेदार बँकेत जाण्यासाठी आग्रह करत होता.
त्यावेळी फिर्यादी यांनी बँकेची वेळ संपलेली आहे तुम्ही उद्या पुन्हा या असे म्हणाल्याचा राग आल्याने खातेदाराने मुझे अभी अभी पैसे चाहीए मुझे कुछ पता नही असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.