spot_img
महाराष्ट्र..म्हणुन शिवतारे आणि पवारांचे जुळले! अजित दादांनी काय दिला शब्द?

..म्हणुन शिवतारे आणि पवारांचे जुळले! अजित दादांनी काय दिला शब्द?

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत टोकाच्या भाषेचा वापर करत बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच माजी मंत्री विजय शिवतारेंनी केली होती. शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांत ठिणगी पडली होती.

याचा परिणाम बारामतीसह ठाण्यातही भोगावा लागणार, हे लक्षात घेऊन बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अजित पवार आणि शिवतारेंची भेट घडली. या भेटीत उभयतांत दिलजमाई झाल्याचे चित्र होते.

गत विधानसभेत अजित पवारांनी शिवतारेंना ठरवून पराभूत केले होते. त्याची सल विजय शिवतारेंच्या मनात अद्यापही खदखदत आहे. दरम्यान, राजकीय स्थिती बदलून अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. आता बारामती लोकसभेसाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र पूर्वीची खदखद शिवतारेंनी लोकसभेनिमित्त बाहेर काढत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवारांनाही आव्हान दिले होते. पवारांचा बदला घेण्याची हीच ती वेळ आहे, असा इशारा देत शिवतारेंनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली. याचा फटका महायुतीलाच बसणार असल्याचे जाणकार सांगत होते.

दरम्यान, लोकसभेत भाजपला ४०० पार साठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. यातूनच ’वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार आणि शिवतारे यांच्याशी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुयातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचे समजते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिवतारे भूमिका मांडणार आहेत.

काहीही करून पवारांना धडा शिकवण्याची भाषा करणार्‍या शिवतारेंचे बंड रात्रीच्या चर्चेनंतर शमल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची माहिती आहे. आगामी विधानसभेत अजित पवार पुरंदरमधून मदत करतील, असा शब्द शिवतारेंना मिळाल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...