spot_img
ब्रेकिंगवाकचौरे यांची उमेदवार जाहीर होताच 'यांची' बंडाची तयारी तर 'ते' पुन्हा मातोश्रीवर

वाकचौरे यांची उमेदवार जाहीर होताच ‘यांची’ बंडाची तयारी तर ‘ते’ पुन्हा मातोश्रीवर

spot_img

शिर्डी। नगर सहयाद्री-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याही नावाची घोषणा केली. परंतु भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेसह महाविकास आघाडीसह इतर पक्षातून जोरदार विरोध होऊ लागला आहे.

भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात शिवसेनेचे समन्वयक अशोक गायकवाड यांनी मातोश्री गाठली, तर काँग्रेसच्या ऊत्कर्षा रूपवते या देखील बंडाचे हत्यार उपसले आहे. अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी ’मातोश्री’कडे धाव घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला.

ठाकरे यांचा विश्वासघात वाकचौरे यांनी केल्याची आठवण करून दिली. तसेच तूप घोटाळ्याची वाकचौरे यांचा कसा संबंध आहे, देखील निर्दशनास आणून दिले. पक्षाने अजून देखील वाकचौरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी गळ घातली. याशिवाय वाकचौरे यांना संधी न देता चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी अशोक गायकवाड यांनी केली. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या महिला आयोगाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या ऊत्कर्षा रूपवते देखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर नाराज झाल्या आहेत. महाविकास आघाडीतून नवीन उमेदवाराला संधी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्रित आणि एक दिलाने काम करणार असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात माझ्या पाठिशी आहेत, असा दावा भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. विद्यमान खासदारांना मतदारसंघातील ९० टक्के लोक ओळखत नाही. तूप घोटाळ्याबाबत सतत आरोप होतो. त्याचे योग्य वेळी उत्तर देणार असल्याचा इशारा भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...