spot_img
महाराष्ट्रपहलगाममध्ये पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार; ‘इतक्या’ पर्यटकांचा मृत्यू, आकडा आला समोर

पहलगाममध्ये पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार; ‘इतक्या’ पर्यटकांचा मृत्यू, आकडा आला समोर

spot_img

Pahalgam Attack:जम्मू-काश्मीर येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्‌‍यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्‌‍यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येत जण जखमी आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही महाराष्ट्रातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. तर काही पर्यटक या हल्ल्‌‍यातून थोडक्यात बचावले आहेत.

कोल्हापूरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 28 पर्यटकांचा जीव वाचला आहे. पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी घोडे वेळत उपलब्ध झाले नाही आणि यामुळेच या पर्यटकांचा जीव वाचला आहे. गोळीबार झालेल्या घटनेपासून अवघ्या दीड किमीवर हे पर्यटक उभे होते. त्यामुळं दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांचा जीव वाचला आहे, असंच आता म्हणावं लागेल. या 28 जणांच्या चमूला ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने उधर फायरिंग सुरू है मत जाओ हे सांगताच हे सर्व पर्यटक माघारी फिरले. या घटनेमुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव या पर्यटकांना आला.

हा सर्व थरारक अनुभव जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला आहे. कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातून काश्मीरच्या पर्यटनासाठी 28 जणांचा चमू गेला होता. मंगळवारी दुपारी पहलगाम पर्यटनासाठी जाण्यासाठी हे सर्वजण तयारी करत होते. ट्रॅव्हल्सने हे सर्वजण पहलगांपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर पोहोचले होते.

28 जणांना एकाच वेळी घोडे उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागला. घोडे उपलब्ध होताच हे सर्वजण घोड्यावर बसू लागले. तेवढ्यात ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने उधर फायरिंग सुरू है मत जाओ असं सांगताच या सर्वांना धक्का बसला. हे सर्वजण घोड्यावरून खाली उतरले. हे सर्व पर्यटक सुखरूप परतीच्या मार्गावर लागले आहेत.

भारताने उत्तर देण्याआधीच पाकिस्तानचे धाबे दणाणले
जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्‌‍याला अजून भारताने उत्तर दिलेलं नाही. पण हे उत्तर देण्याआधीच पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानने बॉर्डरच्या आस-पास मिलिट्री तैनाती वाढवली आहे. सोशल मीडियावरुन हे दावे केले जात आहेत. पाकिस्तानकडून फायटर जेट्सची तैनाती केली जात आहे. पाकिस्तानने अजून यावर पुष्टी केलेली नाही. सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात पाकिस्तान एअरफोर्सची विमानं कराची येथील दक्षिणी बेसवरुन लाहोर आणि रावळपिंडीच्या उत्तरेला असलेल्या एअरबेसच्या दिशेने उड्डाण करत आहेत. रावळपिंडीमध्ये झऋ चा नूर खान बेस आहे. पाकिस्तानचा हा प्रमुख ऑपरेशनल बेस आहे. दुसऱ्या व्हायरल पोस्टमध्ये झऋ101, एक छोटं एम्ब्रेयर फेनोम 100 जेट उड्डाण करताना दिसतय. तखझ ट्रान्सपोर्ट किंवा सिक्रेट ऑपरेशन्ससाठी या विमानांचा वापर केला जातो. पाकिस्तान या सगळ्या हालचालींवर मौन बाळगून आहे.

पहिल्यांदा आम्ही हिंदुस्थानी मग काश्मिरी
दरम्यान, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्‌‍यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनीही सरकारला हल्लेखोरांना कठोर शासन करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीच इथले अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले. त्यांनी या या हल्ल्‌‍याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढला. स्थानिकांनी कँडल मार्च काढून या हल्ल्‌‍याचा निषेध व्यक्त केला. ज्या अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केला, त्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही आधी हिंदुस्तानी आहोत, त्यानंतर आम्ही काश्मीरी, अशी भावना कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली. दुसरीकडे, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना या भागात पोहोचण्यास मदत केली. तसेच, कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तेच लोक स्थानिक भाषेत बोलत पुढे जात होते आणि पाकिस्तानी दहशतवादी त्यांच्यासोबत घटना घडवलेल्या ठिकाणी पोहोचले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक हत्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सहभागी असल्याचे वृत्त आहे.

बेछूट हल्ला करणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांचा फोटो समोर
जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. अंगावर लष्कराचा गणवेश आणि हातामध्ये ऐके-47 रायफल घेऊन एकत्र उभे राहिलेला दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आला असून सध्या तो व्हायरल होत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूव जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूवचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे. लष्करी जवानांच्या गणवेशात या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या चार दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. फोटोमध्ये दिसणाऱ्या या दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांचा जीव घेतला. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‌’लष्कर-ए-तोएबा‌’च्या रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्‌‍याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हल्ल्‌‍यात बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील वैसरन येथे मंगळवारी लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्‌‍यात बळी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जम्मू आणि काश्मीर सरकारने जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. पहलगाममध्ये झालेल्या या घृणास्पद दहशतवादी हल्ल्‌‍याने मला खूप धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. निष्पाप नागरिकांवरील या क्रूर आणि अर्थहीन कृत्याला आपल्या समाजात स्थान नाही. आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, अशा भावना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...