spot_img
ब्रेकिंग..तर तुमचा सुफडा साफ! पुन्हा 'भुजबळ', 'वडेट्टीवार' यांच्यावर संतापले 'मनोज जरांगे'

..तर तुमचा सुफडा साफ! पुन्हा ‘भुजबळ’, ‘वडेट्टीवार’ यांच्यावर संतापले ‘मनोज जरांगे’

spot_img

जालना | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे. त्या विरोधात बोलणार्‍या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का? तुम्ही कोण आम्हाला विचारणार, दरदिवस शांततेत आंदोलन करून सरकारला निवेदन देऊ शकतो. परीक्षा पुढे ढकला असं बोललो नाही. परीक्षा ठेवा. विद्यार्थ्यांना अडचण येता कामा नये असं बोललो. मला नेता व्हायचं नाही तुम्हीचा व्हा. ओबीसी समाजाला छगन भुजबळ सर्वात मोठा डाग लागलाय. मारुतीचे शेपूट तुझ्याकडेच येणार आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिले.

तर मराठ्यांवर टीका कर असं राहुल गांधींनी सांगितलंय का? विरोधी पक्षनेतेपद घरातलं आहे का? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पद दिलंय. राहुल गांधी अशा व्यक्ती कशाला निवडतात माहिती नाही. तुम्ही एका जातीचे विरोधी पक्षनेता आहे का? आमचा दम बघायला गेले तर सगळा सुफडा साफ होईल. मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सगळ्यांचा सुफडा साफ करू शकतो असं सांगत मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवारांना टोला लगावला.

दरम्यान, सरकार एखादा डाव आखू शकतो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडवणार आणि आरोप लावणार, लढणार्‍या बदनाम करावे लागते हे सरकार करणार आहे. माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. देवाइतकीच निष्ठा माझी समाजावर आहे. कुटुंब सोडून मी इथं बसलो नसतो. मी ऐकत नाही, मॅनेज होत नाही. समाजाला न मिळणारं आरक्षण देतोय म्हणून बदनाम करणारे लोक पुढे आणलेत. बदनाम करणार्‍यांचा इतिहास तोंडाने सांगण्यासारखाही नाही असा आरोप जरांगेंनी केला.

जरांगेंच्या सहकार्‍याच्या कारची तोडफोड
मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्‍याच्या कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या कारवर मनोज जरांगे यांचे फोटो असल्याने तोडफोड झाल्याचे बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर काळकुटे हे गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेटी घेऊन घरी निघाले होते. वडिगोद्री फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर त्यांनी कार थोडा वेळ थांबवली होती. त्यावेळी काही अज्ञातांनी येऊन कारची तोडफोड केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...