spot_img
आरोग्यSnoring : तुम्हाला घोरण्याची समस्या असेल तर 'हे' आहेत रामबाण उपाय

Snoring : तुम्हाला घोरण्याची समस्या असेल तर ‘हे’ आहेत रामबाण उपाय

spot_img

health tips : अनेकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते. तुम्हालाही किंवा तुमच्या पार्टनरलाही घोरण्याची सवय असेल. या घोरण्याने घोरणाऱ्या व्यक्तीला काही जाणवत नाही परंतु त्याच्या शेजारी जो झोपतो तो मात्र वैतागून जातो. त्यामुळे तुम्हीही ही घोरण्याची सवय कशी मोडावी याच्या विचारात आहात का? चला जाणून गेहवूयात यावरील काही उपाय –

पाठीवर झोपू नका
काही ऑबझर्वेशन नुसार पाठीवर झोपल्याने घोरण्याचा आवाज जास्त येतो. या स्थितीत आपण असल्याने जीभ थोडी मागे सरकते, त्यामुळे घोरण्याचा आवाज मोठा होतो. त्यामुळे एका अंगावर झोपणे चांगले.

रात्रीचे जेवण लिमिटेड करा
काही लोकांना रात्री खूप खाण्याची सवय असते आणि त्यानंतर ते लगेच झोपायला जातात. याशिवाय अनेकांना रात्रीच्या जेवणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायला आवडते. या सर्व सवयींमुळे घोरण्याची समस्या उद्भवते.

पुरेसे पाणी प्या
शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. डिहायड्रेशन झाल्यास घसा, नाक आणि अनुनासिक नसांमध्ये कोरडेपणा येतो. यामुळे इरिटेशन आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे घोरण्याचा आवाज वाढू शकतो.

कोमट पाण्याने आंघोळ करा
हिवाळ्यात आपण शक्यतो कोमट पाणी अंघोळीला वापरतो. परंतु उन्हाळ्यात शक्यतो आपण हे टाळतो. परंतु जर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ केली तर त्याने म्यूकस विरघळण्यास मदत होईल.
यामुळे नाक आणि घसा साफ होईल.

घोरण्याचे इतरही आहेत कारणे
वजन वाढणे, जास्त दारू पिणे, खूप थकणे, झोप कमी घेणे, आदी कारणाने देखील घोरण्याची समस्या वाढते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरवून सोडणारी संतापजनक घटना! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेसमोर सपासप वार

Maharashtra Crime News: नागपूर शहर हादरवून सोडणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, १६...

पावसाचा जोरदार कमबॅक: राज्यातील ‘या’ १२ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई । नगर सहयाद्री:- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, मुंबईसह...

भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले, कुठे घडली घटना?

Accident News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या...

आज नवरा-बायकोचं दणक्यात वाजण्याची शक्यता, या राशीच्या लोकांनी सावध रहा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे...