spot_img
ब्रेकिंगएसआयटी चौकशीचे आदेश: जरांगे पाटील आक्रमक! म्हणाले, १०० टक्के सत्तेचा वापर, सलाइनसह...

एसआयटी चौकशीचे आदेश: जरांगे पाटील आक्रमक! म्हणाले, १०० टक्के सत्तेचा वापर, सलाइनसह उभा राहणार अन..

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री-
देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी चालवणार हे मला आधिपासून माहिती होतं. जी चौकशी करायची ती करा. आंदोलनावेळी मला सर्वात जास्त फोन देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. तुम्ही माझ्यासोबत काय बोललात हे सगळं मी सांगणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस १०० टक्के सत्तेचा वापर करत आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. कारण मला माहितीये माझा कुठेच दोष नाही. मी प्रत्येक चौकशीला समोरा जाण्यासाठी तयार आहे. चौकशीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे जास्त कॉल रेकॉर्डींग असतील. त्यामुळे ते यात काय काय बोललात हे सर्वकाही समोर येईल, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. तुम्ही आता जरी चौकशीला सुरूवात केली तरी मी तयार आहे. हातला लावलेल्या सलाइन सकट मी चौकशीसाठी उभा राहिल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी २ दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप केले. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी सत्ताधारी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक
देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. ६०० अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...